नागपूर : उच्च शिक्षीत मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी एका अभियंता युवकाने तिला मागणी घातली. तिने नकार देताच चिडलेल्या मित्राने तिच्याशी अश्लील चाळे केले तसेच तिच्या घरावर दगडफेक करून धमकी दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाविरूध्द गुन्हा नोंदविला. रोहीत सांगोळे (२८) असे त्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तो पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित युवतीचे एमएसस्सी, बीएड पर्यंत शिक्षण झाले आहे. तिचे नातेवाईक पाचपावलीत राहतात. नातेवाईकांच्या भेटीला ती जात असे. नातेवाईकांच्या शेजारी राहणाऱ्या रोहितची ओळख तरुणीशी झाली. तेव्हापासून त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेमभावना निर्माण झाली. आठ वर्षांपासून तिच्याशी मैत्री कायम होती. मात्र, त्याला तिच्यावर एकतर्फी प्रेम झाले होते.

हेही वाचा : आता जंगलातला वाघ अवघ्या ३० सेकंदात मोबाईल आणि संगणकावर येणार, काय आहे हे ‘ट्रेलगार्ड एआय’ तंत्रज्ञान

तिच्याशी लग्न करण्यासाठी तो तिच्या मागे लागला आहे. बळजबरीने तिच्याशी बोलायचा. मात्र, या मैत्रीला तिने नेहमीच विरोध केला. दरम्यान हा प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला. तरुणीच्या आईने आरोपीच्या घरी जाऊन त्याची समजूत घालून मुलीचा नाद सोडण्याबाबत सांगितले. यानंतरही तो तिचा पाठलाग करून लग्नासाठी तगादा लावत होता. युवती बुधवारी सकाळी घरी असताना रोहीत तिच्या घरासमोर गेला. दाराला दगड मारले. ‘तुझ्याशी लग्न करायचे आहे. कुणी विरोध केल्यास त्याला बघून घेईन’ अशी धमकी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur boy threatens well educated girl for marriage in one side love adk 83 css