नागपूर : प्रेमसंबंध तोडल्यामुळे चिडलेल्या तरुणाने प्रेयसीचे आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. विजय पृथ्वीराज ठाकरे (वय २५ रा. कळमना) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात तरुणीची फेसबुकवर विजयशी ओळख झाली होती.

हेही वाचा : नागपूर : अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा खून

दोघांमध्ये ‘चॅटिंग’ सुरू झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. दोन वर्षानंतर विजयचा स्वभाव व इतर कारणांमुळे तरुणीने त्याच्यापासून दुरावा करीत प्रेमसंबंध तोडले. यामुळे विजय चिडलेला होता. विजयने प्रेयसीसोबतचे अश्लील छायाचित्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसारित केले. प्रेयसीची बदनामी करून तिला धमकीचे मॅसेज पाठवू लागला. तरुणीने घटनेची तक्रार यशोधरानगर पोलिसात केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून विजयला अटक केली.

Story img Loader