नागपूर : एका तरुणाने वस्तीतच राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण सुरु होते. कुटुंबीयांना याबाबत कळल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तरुणाला अटक केली. ही घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. कृष्णा झनकलाल मच्छिरके (२६) रा. कोराडी, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून, या’ ठिकाणी होणाऱ्या रॅलीत राहणार उपस्थित

हेही वाचा… धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

जून २०२३ मध्ये १५ वर्षीय मुलीला कृष्णाने ओळखी करीत मैत्री करून घेतली. वस्तीतच राहणाऱ्या मुलीच्या घराकडे वारंवार चकरा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. घरी एकटा असताना त्याने मुलीला भेटण्यासाठी बोलावले. तेथे तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. तिने विरोध केला असता लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो सतत मुलीचे लैंगिक शोषण करीत होता. दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांना दोघांच्या संबंधाबाबत कळले. चौकशीत कृष्णाने बैगिक अत्याचार केल्याचे समोर आले. मुलीसह पोलीस स्टेशन गाठून कृष्णा विरुद्ध तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून कृष्णाला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur case registered in sexual abuse of a minor girl for nine months adk 83 asj