नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा महोत्सव मंगळवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने पार पडला. दरवर्षी प्रमाणे यंदाही या कार्यक्रमातील सरसंघचालकांच्या भाषणाची चर्चा झाली, पण सोबतच चर्चा झाली ती कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांची.

या कार्यक्रमाला दरवर्षी नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस हे भाजप नेते उपस्थित राहतात. सत्तेत असतानाही या नेत्यांनी हा कार्यक्रम चुकवला नाही. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही नेते अगदी शेजारी बसले होते. प्रसन्न मुद्रेने परस्परांशी चर्चाही करीत होते. दोन व्हीआयपी कार्यक्रमाला उपस्थित असल्याने प्रशासन व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही येथे हजर होते.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
BJP leader former MP Navneet Ranas campaign vehicle get viral in Amravati
नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

हेही वाचा : नागपूर शहरातील काँग्रेसमधील वादविवादाची परंपरा जुनीच

जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कार्यक्रमस्थळी गडकरी – फडणवीस यांच्याशी संवाद साधतानाचे छायाचित्र चांगलेच चर्चेत आहे. त्याच प्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी म्हटलेले श्लोक आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनीही संघ प्रार्थनेच्या वेळी दाखवलेला पारंपरिक शिस्तबद्धपणा याचीही चर्चा आहे.