नागपूर : अपंग बांधवांच्या सेवेसाठी अत्याधुनिक कृत्रिम अवयव मोबाईल व्हॅनचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण झाले. हे वाहन दररोज अपंग बांधवांच्या तपासणीसह त्यांना विविध सोयी उपलब्ध करून देणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हे वाहन कमीत कमी वेळेत कृत्रिम अवयव बनविण्यास सक्षम आहे. या वाहनात प्रत्येक गरजू व्यक्तीला तज्ज्ञांकडून सल्ला, मूल्यमापन आणि गरजेनुसार सुविधाही दिली जाईल. नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जिथे आरोग्य सेवा पोहोचणे अवघड आहे, तिथेही हे वाहन पोहचून सेवा देऊ शकणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा : “गुणरत्न सदावर्ते यांची मलिन प्रतिमा उजळवण्याची सरकारने सुपारी…”, श्रीरंग बरगे म्हणाले…

हेही वाचा : गोंदिया : ‘त्याने’ घरकूलच काढले विकायला, शासनाचे अनुदान रखडल्याने संताप; देवरी नगरपंचायत पेचात

कार्यक्रमात आयोजकांनी सांगितले की, हे वाहन आंध्र प्रदेश मेड टेक झोन, विशाखापट्टणम यांनी तयार केले आहे. ही व्हॅन कृत्रिम सहाय्यक उपकरणांसह अपंग लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली. त्यामुळे वाहनात कृत्रिम सेवा थेट गरजूंच्या दारापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. या वाहनात एंकल फूट ऑर्थोसिस, शू/ फूटवेअर मॉडिफिकेशन, स्पाइनल ऑर्थोसिस यासारखे प्रोस्थेटिक्स अत्यल्प दरात उपलब्ध केले जाणार आहे. सध्या ही सुविधा भारतात इतरत्र कुठेही नाही. या वाहनात अवयव तयार करण्यासाठी ओव्हन आणि आवश्यक उपकरणे बसवली गेली आहे. वाहनातील कृत्रिम अवयवांचा दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा राहिल, असेही आयोजक म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur central minister nitin gadkari prosthetic limb mobile van ready to serve the disabled mnb 82 css