नागपूर : माजी पंतप्रधान दिवगंत अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभाच्या निमित्ताने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील सर्व मंत्री आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात येत आहे. ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित या सत्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकज भोयर, मंत्री अशोक उईके, मंत्री आकाश फुंडकर व सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला जाणार आहे.
हेही वाचा : राज्यात मुंबईनंतर उपराजधानीत देहव्यापार वाढला, मसाज-स्पामध्ये सर्वाधिक देहव्यापार
निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व विजय मिळाला आहे. नागपूर भाजपने हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नागपूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, पक्षाचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी उपस्थित होते.