नागपूर : महाविकास आघाडी कपट कारस्थान करुन आणि शकुनी नितीने जिंकलीआहे. संविधान बदलवणार असा खोटा अपप्रचार केला. आम्ही विकसित भारतासाठी मत मागितले होते मात्र या निवडणुकीत जातीवाद जिंकला आणि विकासाचा पराभव झाला असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होेते. महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा अपप्रचार केला. पराभवाची कारणे अनेक असली तरी आम्ही त्यावर आत्मचिंतन करीत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात जास्तीत जागा महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीने जातीयवादावर मत मागितले. एरवी भाजप जिंकली तर ईव्हीएममुळे जिंकली असा आरोप विरोधकांकडून केला जातो आता राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर ईव्हीएम बरोबर आहे का? काँग्रेसची दुहेरी निती आहे. जनतेशी खोटे बोलून मत घेतात. एकदा जनता भ्रमित झाली असली तरी आता दुसऱ्यांदा होणार नाही.

हेही वाचा : बळवंत वानखडे यांना अमरावतीकरांनी दिलेली साथ ठरली निर्णायक

जातीच्या राजकारणात जनतेने मतदान केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपने जातीवाद कधीही आणला नाही मात्र विरोधकांनी जातीयवादावर निवडणूक लढवली आहे. फडणवीस यांनी पराभवाची जवाबदारी स्वीकारली आहे. या राज्यात घरकुल दिले, शेतकऱ्यांना सन्मान दिला तरीही जनतेने आम्हाला काही क्षणासाठी दूर केले आहे. फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून काम करावे. केंद्राला आम्ही विनंती केली आहे. फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारु नये आणि वरिष्ठ नेतृत्व स्वीकारणार नाही असा विश्वास आहे.

हेही वाचा : धानोरकर यांच्या विजयात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ.सुभाष धोटे यांची भूमिका महत्त्वाची, तिकीट मिळविण्याच्या संघर्षात…

एक निवडणूक हरल्याने काही फरक पडत नाही, जातपात लोक सोडतील..मुस्लीम बौद्ध आणि आदिवासी समाजाला विरोधकांनी भीती दाखवण्याचे काम केले आहे. मोदी हे देशाचे नेते आहेत, मतदान टक्केवारीत आम्ही पुढे आहोत, काही जागा कमी मतांनी हरलो, मागील वेळेच्या तुलनेत आमची मते वाढली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वणवण फिरून काम केले, महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही ताकदीने लढलो. त्यामुळे महायुतीबद्दल कोणीच संभ्रम निर्माण करू नये,असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur chandrashekhar bavankule said mahavikas aghadi win with shakuni niti vmb 67 css