नागपूर: शहरातील मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेद या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा २६ ऑगस्टला झाली. नागपुरातील वाडी येथील केंद्रात लग्नानंतर महिलांच्या बदललेल्या नावाच्या कागदपत्रावर आक्षेप घेत काहींना परीक्षेसाठी परवानगी मिळाली नाही. या महिलांनी तेथे गोंधळ घालत परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नागपुरातील मेडिकल आणि मेयोसह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर, शिपाई, हमाल, कक्ष परिचर, गँगमन, माळी, संग्रहालय परिचर, किचन, स्टोअर बॉय, क्लीनर अशी वर्ग-४ ची ६८० पदे भरली जाणार आहेत. यासाठी आयबीपीएस एजन्सीमार्फत २६ ऑगस्टला परीक्षा झाली. परीक्षेचे एक केंद्र वाडीतही होते. या केंद्रात परीक्षेच्या वेळेवर उमेदवार पोहचले. दरम्यान काही महिलांनी लग्नानंतर आवश्यक कागदपत्र सोबत आणले नसल्याचे सांगत त्यांना केंद्रातून बाहेर काढले गेले. या महिलांना परीक्षा देता आली नसल्याने त्यांनी केंद्राच्या बाहेर गोंधळ घालत परीक्षा प्रक्रियेवरच आक्षेप घेतला. दरम्यान येथे पोलिसांचा बंदोबस्त असल्याने अनुचित प्रकार घडला नाही. या विषयावर एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर ही घटना घडल्याचे मान्य करत या महिलांनी सोबत आवश्यक कागदपत्र आणले नसल्याने त्यांना परीक्षेला बसू देता येत नसल्याचा दावा केला.

Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
registration process for mh nursing cet 2025 exam started
MH BSc Nursing CET 2025: बीएस्सी नर्सिंगसह परिचारिका संवर्गातील अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
upsc training center loksatta news
जिल्हास्तरावर यूपीएससी, एमपीएससीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार? सुधारणा समितीसमोर…
Success Story : इच्छाशक्ती! कोट्यावधीची नोकरी सोडून निवडले आयएएस पद; वाचा देशात पहिला येणाऱ्या कनिष्क कटारियाची गोष्ट

हे ही वाचा… असे असावे टुमदार घरकुल, उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात…

६८० पदांसाठी ६४ हजार अर्ज

जिल्हा निवड समितीमार्फत मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेद व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र काटोल येथे पदभरती प्रक्रिया सुरू आहे. २० जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागवण्यात आले. एकूण ६८० पदांसाठी ६४ हजार उमेदवारांनी अर्ज केले. या पदांसाठी किमान पात्रता १० वी उत्तीर्ण अशी आहे. परीक्षेसाठी एप्रिलपासून विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षांची फेरी सुरू आहे.

हे ही वाचा… महिलेची मुला-मुलीसह आत्महत्या! काय घडले नेमके?

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालीटी, आयुर्वेद, दंत महाविद्यालयामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे स्वच्छता, रुग्णांना एका ठिकाणाहून इतरत्र हलवणे, रुग्णांच्या जखमांची मलमपट्टी, विविध तपासणीशी संबंधित कामांमध्ये अडचणी येतात. रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने येथे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे वाढवण्यासाठी शासनाला मागणी केली जाते. परंतु विविध कारणाने परवानगी मिळत नाही. यंदा जिल्हा निवड समितीमार्फत येथील ६८० पदांसाठीची पदभरती होत असून हे काम आयबीपीएस एजन्सीला देण्यात आले आहे. तर परीक्षेसाठी मेडिकल- मेयोतीलही बऱ्याच अधिकारी- कर्मचाऱ्यांचा तेथे सेवा लावण्यात आल्या होत्या.

Story img Loader