नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना नागपुरात एक टोला लगावला. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) भेट दिल्यावर पत्रकारांशी फडणवीस बोलत होते. शुक्रवारी नागपुरातील एका झालेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाल होते की, उद्धव ठाकरे पूर्वी माझे मित्र होते. आता राज ठाकरे मित्र आहे. त्यावर संजय राऊत यांनी शनिवारी फडणवीसांवर टीका करतांना देवेंद्र फडणवीस नाही ठरवणार कोणता पक्ष भविष्यात कुठल्या पक्षासोबत जाणार. फडणवीसांनी आपचा पक्ष फोडला. ही कुठली आयडिओलाॅजी आहे.असा सवाल केला.त्यावर माध्यमांनी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, संजय राऊत यांनी त्यांचे मत व्यक्त केले. मी मुलाखतीत माझे मत व्यक्त केले. मी कुणाच्याही प्रश्नावर उत्तर द्यायला बांधील नाही. कुणीही बोलल्यास त्यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करायला. ते (संजय राऊत) रिकामटेकडे आहे. ते रोज बोलतात मी रिकामटेकडा नाही, असे फडणवीस म्हणाले.

मेडिकल, मेयो रुग्णालयाबाबत….

नागपुरातील मेडिकल आणि मेयो हे दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये जुनी आहेत. दोन्ही महाविद्यालयातील इमारतींना अनेक दशक झाले आहे. त्यामुळे येथील इमारती अध्यायावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आज आढावा घेतला आहे. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, गती वाढवण्याची आवश्यकता आहे, एप्रिल महिन्यामध्ये मी पुन्हा आढावा घेणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

हेही वाचा : टिपेश्वर अभयारण्यातील दोन वाघ बेपत्ता, तलाववाली आणि जंजीर…

महाविकास आघाडीबाबत…

महाविकास आघाडी राहील की तुटेल याकडे आमचे लक्ष नाही. महाराष्ट्र प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. नितेश राणे यांनी ईव्हीएमवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, ते काय बोलले, हे मी ऐकले नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही.

Story img Loader