नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना नागपुरात एक टोला लगावला. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) भेट दिल्यावर पत्रकारांशी फडणवीस बोलत होते. शुक्रवारी नागपुरातील एका झालेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाल होते की, उद्धव ठाकरे पूर्वी माझे मित्र होते. आता राज ठाकरे मित्र आहे. त्यावर संजय राऊत यांनी शनिवारी फडणवीसांवर टीका करतांना देवेंद्र फडणवीस नाही ठरवणार कोणता पक्ष भविष्यात कुठल्या पक्षासोबत जाणार. फडणवीसांनी आपचा पक्ष फोडला. ही कुठली आयडिओलाॅजी आहे.असा सवाल केला.त्यावर माध्यमांनी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, संजय राऊत यांनी त्यांचे मत व्यक्त केले. मी मुलाखतीत माझे मत व्यक्त केले. मी कुणाच्याही प्रश्नावर उत्तर द्यायला बांधील नाही. कुणीही बोलल्यास त्यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करायला. ते (संजय राऊत) रिकामटेकडे आहे. ते रोज बोलतात मी रिकामटेकडा नाही, असे फडणवीस म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा