नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटातील काही आमदारांनी बुधवारी सकाळी नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले. मुख्यमंत्री शिंदे सकाळी साडेदहाच्या सुमारास स्मृतीभवन येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भरतसेठ गोगावले उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.

उल्लेखनीय आहे की, मंगळवारी भाजपाचे सर्व आमदार आणि शिंदे गटाचे चार आमदार स्मृतिभवनात आले होते. त्या दिवशी भाजपा आमदारांसोबत शिंदे गटाचे सर्व आमदारही येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रेशीमबागला आले आणि डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : नागपूर हादरले! घरमालकाचा भाडेकरू विवाहितेवर बलात्कार

भेटीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री?

आदरांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, पुरोगामी राज्यात सर्व जातींना एकत्र घेऊन आम्ही चाललो आहे. लोकांच्या भावनांचा विचार करूनच आम्ही सर्व निर्णय घेतो आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा आणि स्मृती मंदिर याचा काही संबंध नाही आणि यात कुठलेही राजकारण नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे हिंदुत्व आम्ही जपतो आहे आणि त्या विचारावर आम्ही काम करत आहोत.

महाविकास आघाडीवरही टीका

हे सामान्य माणसाचे सरकार आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आल्या त्या विकासाच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली. जनतेला सरकारच्या योजनांचा लाभ व्हावा, त्यांच्यामध्ये सुखसमृद्धी नांदावी, समाजाच्या शेवटच्या माणसाला सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही काम करीत आहो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा : “सुधीरभाऊ…तुमचेच पंतप्रधान अन् मुख्यमंत्री”, महादेव जानकर म्हणाले…

स्मृती मंदिर परिसर प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान

स्मृती मंदिर परिसर हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे. येथे कामाची ऊर्जा मिळते. त्यामुळे येथे नतमस्तक व्हायला आलो. हे सेवा करण्याचे स्थान आहे. त्यामुळे समाजाची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला येथून मिळते, मला काय मिळेल यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो हा विचार घेऊन आम्ही येथून जात असतो, असेही शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader