नागपूर : वाघांची शिकार आणि तस्करीचा धोका टळलेला नसतानाच आता वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या अधिसूची एकमधील ‘कॉमन क्रेन’ या पक्ष्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगालवरून मुंबई शहरात तस्करीसाठी नेल्या जाणाऱ्या या पक्ष्यांच्या तस्करीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे उघड झाले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अटी आणि शर्तीवर जामीन मिळाल्याने तपासयंत्रणेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा आणि देवरीदरम्यान पाच ते सहा दिवसांपूर्वी पश्चिम बंगालवरून पाच ‘कॉमन क्रेन’ मुंबईला नेत असताना आरोपींना अटक करण्यात आली. डोंगरगाव महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे व दोन हवालदारांनी आरोपींची वाहने अडवली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १६ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या ताब्यातील पक्ष्यांची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात करण्यात आली. हे सर्व आरोपी आणि त्यांची वाहने गुजरातमधील होती. यापूर्वीही दोनदा ‘कॉमन क्रेन’ची तस्करी करण्यात आली असून अटकेतील एका आरोपीचा यात सहभाग होता.

Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे
prashant kishor
Prashant Kishor : विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अखेर बिनशर्त जामीन मंजूर, नेमकं काय घडलं?

हेही वाचा : वडिलांचा मृत्यू, भाऊ दगावला…गडकरींचा पाठपुरावा…अन मध्य रेल्वेकडून महिलेला…

त्यांच्याकडे बनावट वाहतूक परवाना, प्रस्ताव व संगणकावर तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रे सापडली. तसेच त्यांच्याकडे सौदी अरेबियातील हॉटेल्सचे काही ‘व्हिजिटिंग कार्ड’ मिळाले. त्यामुळे ही तस्करी आंतरराज्यीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाचा तपासही वाघांच्या तस्करीप्रमाणेच करणे अपेक्षित होते व त्यासाठी विशेष चमू नेमणे आवश्यक होते. मात्र, तपासयंत्रणेत गांभीर्य नसल्याचा फायदा आरोपींच्या वकिलांनी घेतला आणि अटी व शर्तींवर आरोपींना जामीन मिळाला.

हेही वाचा : वाशिम: ‘स्ट्रीट लाईट’च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी अनोख्या संकटात

गोरेवाडा बचाव केंद्रात आणलेल्या तस्करीतील पाच ‘कॉमन क्रेन’ पैकी एकाचा अतिसारामुळे मृत्यू झाला. उर्वरित दोनची स्थिती चांगली असली तरी आणखी दोघांना ही लागण झाल्यामुळे अधिसूची एकमधील हे पक्षी जिवंत राहतील का, शंकाच आहे. ‘कॉमन क्रेन’च्या तस्करीचे प्रकरण आंतरराज्य नाही तर आंतरराष्ट्रीय आहे. यात फक्त पक्ष्यांचीच नाही तर इतरही वन्यजीवांच्या तस्करीची मोठी साखळी असण्याची दाट शक्यता आहे. तस्करी उघडकीस आल्यानंतर आरोपींना वनकोठडी सुनावण्यात आली. यानंतर खरे तर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळायला हवी होती. अधिसूची एकमधील पक्ष्यांच्या तस्करीचे प्रकरण असताना तपासही त्याच दर्जाचा हवा होता. मात्र, आरोपींना न्यायालयीन कोठडीऐवजी अटी व शर्तीवर जामीन मिळाल्याने तपासयंत्रणेतील त्रुटी समोर आल्या आहेत’, असे गोंदिया येथील मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी म्हटले आहे.

Story img Loader