नागपूर : शहर काँग्रेसने आज देवडीया काँग्रेस भवन कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निषेध आंदोलनात आमदार ॲड. अभिजीत वंजारी, मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, रमन पैगवार, अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम खान, प्रा.दिनेश बानाबाकोडे, राष्ट्रीय मिडिया समन्वयक आकाश तायवाडे, महेश श्रीवास, प्रदेश प्रतिनिधी सरफराज खान सहभागी झाले होते.
हेही वाचा : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती, या पदांसाठी असा भरा अर्ज…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छायाचित्राशी छेडछाड करून त्या छायाचित्राला रावणाची उपमा देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. हे छायाचित्र भाजपने समाजमाध्यमात प्रसारित केले आहे. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आणि इंडिया आघाडीला घाबरलेल्या भाजपने नैराश्यातून हे कृत्य केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली. तसेच राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात देवडिया काँग्रेस भवन कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हुकुमशाही मोदी असे संबोधण्यात आले.