नागपूर : प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित नागपूर जिल्हानिहाय विभागीय बैठक १२ ऑक्टोबरला महाकाळकर सभागृह, दत्तात्रय नगर येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असताना प्रथम नागपूर शहराची आढावा बैठक असल्याने नागपूर शहराचा आढावा नगर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी पटोले यांना यांच्या समोर प्रस्तृत केला. त्यानंतर नागपूर शहराची बैठक आटोपली आहे. सर्व शहरातील पदाधिकाऱ्यांनी, हाॅल मध्ये जावून नाश्ता करावा, असे सांगितले आणि आता ग्रामीण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक असल्याने नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहात आपले स्थान ग्रहण करावे, अशी विनंती विकास ठाकरे करत असताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेले प्रदेश काँग्रेसचे सचिव नरेद्र जिचकार यांनी आपल्या जागेवरुन उठून शिवीगाळ केली. तसेच विकास ठाकरे यांच्या हातातून माईक हिसकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे व्यासपीठावर गोंधळ निर्माण झाला. व्यासपीठावरुन अध्यक्ष घसरले आणि मोठया प्रमाणावर गोंध‌ळ निर्माण झाला.

हेही वाचा : “अजित पवार हे नक्कीच मुख्यमंत्री होणार,” माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे विधान

हेही वाचा : चक्क महागड्या वाहनांमधून होतेय गोवंशाची तस्करी!; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळी गजाआड

नागपूर शहर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची तातडीची बैठक शुक्रवारी शहर काँग्रेसचे प्रधान महासचिव डाॅ. गजराज हटेवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत शिस्तपालन समितीचे सदस्य माजी नगरसेवक ॲड. यशवंत मेश्राम, माजी नगरसेवक वासुदेव ढोके, नगर काँग्रेस उपाध्यक्ष संजय सरायकर, नगर काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, माजी नगरसेवक संदीप सहारे प्रामुख्याने उपस्थित होते. जिचकार यांना काही बोलायचे होते तर प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेऊन बोलणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केले नाही, म्हणून जिचकार यांच्यावर पक्ष शिस्त भंगाची कारवाई करुन त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करावे, तसेच पक्षातून कायमची हकालपटटी करावी, असा ठराव नागपूर शहर जिल्हा काँग्रेस शिस्तपालन समिती द्वारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला, असे शहर काँग्रेसचे प्रधान महासचिव डाॅ. गजराज हटेवार यांनी सांगितले.

Story img Loader