नागपूर : प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित नागपूर जिल्हानिहाय विभागीय बैठक १२ ऑक्टोबरला महाकाळकर सभागृह, दत्तात्रय नगर येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असताना प्रथम नागपूर शहराची आढावा बैठक असल्याने नागपूर शहराचा आढावा नगर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी पटोले यांना यांच्या समोर प्रस्तृत केला. त्यानंतर नागपूर शहराची बैठक आटोपली आहे. सर्व शहरातील पदाधिकाऱ्यांनी, हाॅल मध्ये जावून नाश्ता करावा, असे सांगितले आणि आता ग्रामीण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक असल्याने नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहात आपले स्थान ग्रहण करावे, अशी विनंती विकास ठाकरे करत असताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेले प्रदेश काँग्रेसचे सचिव नरेद्र जिचकार यांनी आपल्या जागेवरुन उठून शिवीगाळ केली. तसेच विकास ठाकरे यांच्या हातातून माईक हिसकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे व्यासपीठावर गोंधळ निर्माण झाला. व्यासपीठावरुन अध्यक्ष घसरले आणि मोठया प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला.
विभागीय बैठकीत गोंधळ घालणारे नरेंद्र जिचकार यांच्या हकालट्टीचा शहर शिस्तपालन समितीचा ठराव
नागपूर शहर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची तातडीची बैठक शुक्रवारी शहर काँग्रेसचे प्रधान महासचिव डाॅ. गजराज हटेवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-10-2023 at 14:00 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur congress city disciplinary committee passes resolution to terminate narendra jichkar from congress party rbt 74 css