नागपूर : देशभरात काँग्रेसचे जनसमर्थन वाढत आहे, नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पक्षांच्या मतांमध्ये वाढ दिसून आली. कर्नाटकनंतर काँग्रेसने तेलंगणातही स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली. दुसरीकडे भाजपा सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहे. देशाची संसदही सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित असेल, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी केला. नागपूरच्या हॉटेल ली मेरिडीयन येथे के. सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री खा. मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा, भरत गोगावले म्हणतात, “मुख्यमंत्री…”

लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेची आतापर्यंत दोनदा सुरक्षा भेदली गेली. दोन्ही वेळेस केंद्रांत भाजपाचेच सरकार होते. संसदेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारले असता, प्रश्न विचारणाऱ्या १४ सदस्यांनाच निलंबित करण्यात आले, पण ज्या भाजपा खासदारांकडून या हल्लेखोरांना पास देण्यात आले होते त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली नाही. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री डॉ नितीन राऊत, सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिशन ओझा, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, अमर राजूरकर, नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, अभिजीत सपकाळ आदी नेते उपस्थित होते.