नागपूर : शेतकरी मेले तरी चालेल, अशी भूमिका मोदी सरकारची आहे, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हान यांनी केली. केंद्र सरकार राज्याचे ऐकायला तयार नाही. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्दयी निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी कांदा उत्पादकांच्या मागे उभे राहायला हवे.
हेही वाचा : “लव्ह जिहादविरुद्धची समिती लोकांवर दबाव आणत आहे”, अबू आझमी यांचा आरोप; म्हणाले, “तातडीने रद्द करा…”
देवेंद्र फडणवीस केंद्रात कुणाला तरी भेटतात. अजित पवार एक सांगतात. पण, केंद्र सरकार यांचे ऐकायला तयार नाही. शेतकरी मेला तरी चालेल, यांना काही फरक पडत नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.