नागपूर : उपयोग असला तर त्याचा वापर करायचा आणि उपयुक्तता संपली की कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून द्यायची हे भारतीय पक्षाचे नेहमीच धोरण आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची उपयोगीता संपली आहे. त्यामुळे ते या स्थितीतून आणि दुःखातून कसे सावरतात याकडे महाराष्ट्र बघत आहे. धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते, अशी अवस्था त्यांची झाली असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय वडेट्टीवार रविवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांनी इंडिया आघाडी आशीर्वाद दिला. त्यामुळे तेथील जागा आम्ही जिंकलो. प्रभू रामचंद्र आमचे श्रद्धास्थान आहे. प्रभूरामचंद्रानी भाजपला नाकारले आहे. एनडीएने मॅजिक आकडा हा पूर्ण केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव खासदाराला महत्व दिले काय आणि ते गेले काय, त्यांना काही फरक पडणार नाही. अजित पवार गटाची आता मजबुरी आहे. यांना सत्तेसोबत राहावेच लागणार आहे. अजित पवारांनी कॅबिनेटची मागणी केली तरी एका खासदारावर कॅबिनेट मंत्रीपद ते कशाला देतील. लोकसभेच्या एका जागेवर अजित पवार गटाला एक राज्यमंत्रीपद मिळत होते, ते त्यांनी स्वीकारला हवे होते असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : बुलढाण्याला केंद्रात तिसऱ्यांदा ‘लाल दिवा’!प्रतापराव जाधव यांची मंत्रीपदी वर्णी

तेलगू देसमने मुस्लिमांना आरक्षण दिले आहे. सुखके सब साथी दुख मे ना कोई आता, जेडीयु आणि चंद्राबाबूचा दुःखात कोण राहील हे येणार काळ ठरवेल. चंद्राबाबू नायडूला एकच कॅबिनेट मंत्री मंत्रीपद देत त्यांची बिना पाण्याने हजामत केली आहे. पुढे काय काय होते ते पाहू. तिसऱ्यांदा शपथ घेताना मोदींनी पुढल्या काळात दोन मित्र पक्ष फोडले नाही आणि त्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या नाही तर नवल वाटू नये अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा : दाम्पत्याचा घटस्फोट….पण, मुलाला पित्याची ओढ….शाळेतून थेट पित्याचे घर गाठले, अन् तिकडे आई….

जेडीयुच्या खूप अपेक्षा होत्या. आता मोदी सरकार जे देईल ते त्यांना घ्यावे लागणार आहे. नाही तर उद्या तेही मिळणार नाही. चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पक्ष पुढील सहा महिन्यात काय निर्णय घेतात आणि कोणत्या दिशेने सरकार जाते, हे आता आम्ही विरोधात राहून बघणार आहोत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडू ,असेही वडेट्टीवार म्हणाले. केंद्रात एनडीए सरकार आले असताना येणाऱ्या दिवसात ते कुठल्या दिशेने जाते लवकरच दिसणार आहे असेही वडेट्टीवार म्हणाले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur congress leader vijay wadettiwar criticizes ajit pawar about his nda alliance position vmb 67 css
Show comments