नागपूर : राज्य सरकारने जायकवाडीत पाणी सोडण्यास स्थगित दिल्याचे पत्र व्हायरल झाले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. सध्या राज्यात कोण कोणाला आव्हान देत आहे, हे कळेनासे झाले आहे. गृहखात्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचे तस्कर सक्रीय
राज्य सरकारमधील तीन नेत्यांची तोंडं तीन दिशेला आहेत. कुणाचेही कोणत्याच बाबतीत एकमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणीतरी पत्र देतात आणि ते व्हायरलं होते. अशाप्रकारे सरकारच्या उरल्या सुरल्या इभ्रतीचे वाभाडे काढण्याचे काम सध्या सुरू आहे. सरकारमधील तीन पक्षाचे नेते एकमेकांची तोंड पाहायला तयार नाहीत. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्यासमोर मोठे आव्हान आहे. या आव्हानाला गृहखाते आणि फडणवीस कसे तोंड देतात हे बघण्यासारखे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.