नागपूर : प्रदेश भाजपच्या ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन या चित्रफिती टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. शिवसेना (शिंदे गट) या ट्विटमुळे काळजीत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हे ट्विट काढून टाकण्यात आले. मात्र, हे ट्विट म्हणजे डावपेचाच भाग असून काही तरी नक्कीच शिजत आहे, असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वडेट्टीवार यांना भाजपच्या या ट्विटबद्दल पत्रकारांनी शनिवारी विचारले असता ते म्हणाले, या ट्विट करण्यामागे काहीतरी राजकारण नक्की शिजत आहे. कारण हे सहज केलेले ट्विट होते, असे वाटत नाही. पुन्हा येणार नसल्याची खात्री पटल्यानेच ते ट्विट डिलीट केले असावे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी हाणला.

हेही वाचा : “गावबंदीचा काहीही फरक पडणार नाही,” मंत्री विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन

केंद्राने मराठा आरक्षण प्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय केंद्राला विचारून घेतला नव्हता. आता आंदोलन चिघळले आहे. आज जी परिस्थिती झाली आहे, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने सरकारने राजीनामा द्यावा. जरांगे पाटील यांनी तरी ४० दिवस सरकारवर भरोसा का ठेवला, असा सवाल करत राज्य सरकार या काळात केंद्रात गेले नाही आणि मुदत संपल्यावर गेले. आता साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग, असा सवालही त्यांनी केला.