नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन बांधणीसाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गोंधळ बघावयास मिळाला. शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांची बाचाबाची झाली. ठाकरे यांच्या हातून जिचकार यांनी माईक हिसकला होता. पक्ष संघटनेची स्थिती जाणून घेऊन ती मजबूत करण्यासाठी विभागीय बैठक महाकाळकार सभागृहात सुरू आहे.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या हैदराबाद येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्देशानुसार नागपूर विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक होत आहे. नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर शहर व चंद्रपूर ग्रामीण काॅग्रेस, विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री डाॅ. नितीन राऊत, आमदार सुनील केदार, डाॅ. सतीश चतुर्वेदी, डाॅ. अनीस अहमद, आमदार ॲड. अभिजीत वंजारी, प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे व बैठकीचे समन्वयक प्रदेश सरचिटणीस नाना गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

हेही वाचा… सावधान ! इंडियन कोस्ट गार्डचा अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला अन्…

हेही वाचा… सावनेरातील रॉयल लॉजवर देहव्यापार, पोलिसांनी छापा टाकताच…

या बैठकीमध्ये उदयपूर राजस्थान शिबिरातील निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा, वार्ड, मंडळ कमिटी, बुथ प्रमुख बीएलए, ब्लाॅक कार्यकारिणी, जिल्ह्यातील संघटनात्मक रिक्त पदांची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या दृष्टीने मतदार यादी पुनरिक्षण चर्चा, जिल्हा व ब्लाॅक काँग्रेस कमिटीच्या ठराव पुस्तकांची तपासणी केली जात आहे.