लोकसत्ता टीम

नागपूर: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला. या ऐतिहासिक निकालावर शहरातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष लागले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर आहे. न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होत असताना घडलेल्या घटनांबाबत ताशेरे ओढले आहेत. तसेच त्यावर योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर टाकली आहे. न्यायालयाने ताशेरे ओढलेल्या घटनांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय भूमिका घेतात हे बघावे लागेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा… गजानन अंबुलकर यांच्या गांधीवादी आठवणींचे ‘ कलेचा नंदादीप ‘ पुस्तकाचे प्रकाशन; त्यांचेच चित्र विनोबाजींच्या डाक तिकिटावर

सत्याचा विजय

भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी या निकालास सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, भाजपच्या पाठीत खंजिर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली. त्यामुळे आमदारांची घुसमट होत होती. म्हणून त्यांनी उठाव केला. त्या उठावाला आज खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली आहे.

Story img Loader