नागपूर : भारतातील सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीकडून जनधन योजनेअंतर्गत ‘स्क्रॅच क्रार्ड’ देण्यात येत असून प्रत्येकाच्या खात्यात पाच हजारापेक्षा जास्त रक्कम टाकण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. हा सर्व खेळ सायबर गुन्हेगारांनी सुरु केला असून आतापर्यंत हजारो जणांच्या बँक खात्यातून पैसे परस्पर वळते करून फसवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून सामान्य नागरिकांना फसविण्यासाठी नवनवीन जाळे टाकत आहेत. नागरिकांच्या बँक खात्याची माहिती गोळा करून त्यामधून परस्पर पैसे वळते करीत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांनी समाजमाध्यमांवर काही लिंक टाकल्या असून त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने जनधन योजनेअंतर्गत ‘स्क्रॅच क्रार्ड’ देण्यात येत आहे.

हेही वाचा : भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क

ते कार्ड स्क्रॅच केल्यानंतर त्यामध्ये लिहिलेली रक्कम भारतीय जनता पक्षाकडून थेट बँकेत जमा करण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. ‘स्क्रॅच क्रार्ड’च्या लिंक आणि कार्ड अनेक संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर झळकलेले आहेत. तसेच पक्षाचे काही कार्यकर्ते आणि समर्थकही या स्क्रॅचकार्डची शहानिशा न करता अनेक व्हॉट्सअॅप ग्रूपवर झपाट्याने फिरवत आहेत. मात्र, या फसव्या योजनेला अनेक सामान्य नागरिक बळी पडत आहेत. जनधन योजनेचे पाच हजार रुपये खात्यात येतील, ही भाबडी आशा ठेवून असलेल्या व्यक्तींच्या खात्यातून सायबर गुन्हेगार पैसे काढून फसवणूक करीत आहेत. खात्यातून पैसे काढल्याचा संदेश मोबाईल आल्यानंतर अनेकांचे डोळे उघडत आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यातील नागरिकांना लक्ष्य केले आहे.

हेही वाचा : ‘गण गण गणात बोते’, शेगाव नगरीत लाखांवर भाविकांची मांदियाळी!

काय आहे ‘स्क्रॅच क्रार्ड’ योजना

सायबर गुन्हेगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वापर स्क्रॅच कार्डवर केला आहे. त्यामुळे अनेकांनी या स्क्रॅचकार्डवर विश्वास बसतो. झारखंड-जामतारा आणि दिल्ली-नोएडा शहरात बसलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या मोदी आणि भाजपच्या नावावर जनधन योजनेचे नावाचा गैरवापर करीत आहेत. स्क्रॅचकार्डमध्ये निघालेली ५ हजारांची रक्कम देण्यासाठी बँक खाते आणि एटीएमचा पासवर्ड मागितल्या जाते. सायबर बँकेतून परस्पर पैसे काढून फसवणूक केल्या जाते.

“कोणत्याही ‘स्क्रॅच क्रार्ड’सारख्या योजनेवर विश्वास ठेवू नये. सायबर गुन्हेगारांनी टाकलेले हे जाळे असते. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये किंवा आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये. कुणाचाही फसवणूक झाल्यास थेट सायबर पोलीस ठाण्यात लगेच तक्रार करावी” – संदीप बागूल, सहायक निरीक्षक (सायबर पोलीस ठाणे)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur cyber criminals fraud with jan dhan yojna scratch card adk 83 css
Show comments