नागपूर : इंस्टाग्रामवरील स्टॉक मॉर्केटमध्ये गुंतवणुकीतून झटपट पैसे कमविण्याच्या जाहिरातीला बळी पडलेल्या एका युवकाची केवळ एका महिन्यात २६ लाख ८५ हजार रुपयांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने त्या युवकाला व्यवस्थितपणे जाळ्यात अडकवून पैसे उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने पोलिसात तक्रार दिली. निलेश देवनाथ खापरे (३५, रा. विनोबाभावे नगर ) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली-नोएडा आणि झारखंडमधील सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या स्टॉक मार्केटमधील नफा मिळविण्याचे आमिष दाखवून जाळे फेकत आहेत. आतापर्यंत देशभरातील हजारो युवकांना झटपट पैसा कमविण्याच्या नादात सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधीने लुटमार केली आहे. गुंतवणुकदार एकदा का जाळ्यात अडकला की तो लाखो रुपये गुंतवणूक करून सायबर गुन्हेगारांच्या घशात घालतो. अशाच प्रकारची घटना नागपुरात उघडकीस आली. २0 फेबु्वारी ते ११ मार्च यादरम्यान निलेश खापरे याला इंस्टाग्रामवर एक जाहिरात दिसली. त्यात स्टॉक मार्केटमध्ये ५ ते १0 टक्के नफ्याबाबत सांगितले होते. त्यानंतर आरोपी जिया शंकर अ‍ॅडमीन हिने निलेशला पैशाचे आमीष दाखवून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जोडून घेतले.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video

हेही वाचा…वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सेमिकंडक्टर सुविधांची पायाभरणी, विद्यापीठातून थेट प्रक्षेपण

आरोपी पूजा आणि आर्यन रेड्डी यांनी संगनमत करून निलेश यांना वेगवेगळया ट्रान्जेक्शन आयडी दिल्या. तसेच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना २६ लाख ८५ हजार रुपये लाईन व आरटीजीएसद्वारे भरण्यास भाग पाडले. आरोपींनी त्यांना कोणत्याही प्रकारचा नफा किंवा मुद्दल परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी निलेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

हेही वाचा…जेनेरिक औषधांच्या माध्यमातूनही ‘भाजप’चा प्रचार!

खात्यात पैसे दिसतात जमा

सायबर गुन्हेगार नफा बँक खात्यात जमा करीत असल्याचे सांगून अॅपवर काही पैसे जमा करतात. ते पैसे फक्त काल्पनिकरित्या खात्यात जमा असल्याचे दिसतात. प्रत्यक्षात ते पैसे बँकेतून काढता येत नाहीत. मात्र, गुंतवणुकदार नफा रोज जमा होत असल्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक करण्यास धजावतो. याच आमिषाला बळी पडून गुंतवणुकदारांची फसवणूक होते.

Story img Loader