नागपूर : मागील आठवड्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शहरातील तलाव आणि जिल्ह्यातील मोठी धरणे तुडुंब भरली आहेत. शहरातील अंबाझरी तलाव यंदा पावसाळ्यात प्रथमच भरला असून तेथे पर्यटकांनी गर्दी केली आहे.
बुधवार रात्री से गुरूवारी सकाळपर्यंत झालेल्या विक्रमी पावसामुळे तलाव, नद्या आणि सिंचन प्रकल्प भरले. शहराला पाणीपुरवठा करणारा तोतलाडोह, वडगाव धरण, नवेगाव खैरी प्रकल्प भरले आहे. वडगाव धरणाचे २१ दार उघण्यात आले आहे. तोतलाडोह ८१ टक्के, वडगाव ९१ टक्के, नवेगाव खैरी ७४ टक्के आणि नांद ६७ टक्के भरले.
हेही वाचा – Video : महिला नालीत पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, नगर परिषदेविरोधात यवतमाळ शहरात प्रचंड रोष
हेही वाचा – वर्धा : पाणीच पाणी चहूकडे! गर्भवती मातांची सुरक्षा, भोजन व्यवस्था प्राधान्याने
अंबाझरी तलावावर पर्यटकांची गर्दी
ओव्हरफ्लो झालेला अंबाझरी तलाव पाहण्यासाठी आणि पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी नागपूरकर पर्यटकांनी गर्दी केली आहे.