नागपूर : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने ‘गाव चलो’ अभियान सुरू केले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रमुख नेत्याला एक दिवस गावात मुक्काम करायचा आहे. नागपूरमध्ये गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांच्यासारखे भाजपचे बडे नेते राहतात. ते सुद्धा या मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यांचा मुक्काम जिल्ह्यातील दोन प्रसिद्ध तीर्थस्थळी राहणार आहे.

हेही वाचा : नागपूर : फुल व्यापाऱ्याच्या घरात घुसले दरोडेखोर; वृद्धेच्या गळ्यावर चाकू लावून…

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

४ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात भाजपचे ‘गाव चलो’ अभियान राबविण्यात येत आहे. कार्यकर्ता हा जनतेच्या सतत संपर्कात असला पाहीजे, या दृष्टीने विवीध अभियान भाजपकडून राबवण्यात येतात. त्याच प्रमाणे प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांतील योजना पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानात सहभागी होणारे गडकरी, फडणवीस हे नेते कोणत्या गावात जाणार याबाबत उत्सुकता होती. गडकरी यांनी या अभियानासाठी त्यांचे स्वतःचे गाव व जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ धापेवाडाची निवड केली. विदर्भाचे पंढरपूर म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात गडकरी गाव चलो अभियानादरम्यान मुक्काम करणार आहेत. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ पारडसिंगा (ता. काटोल ) येथे, मुक्काम करणार आहेत. पारडसिंगा येथे सती अनसूयामातेची समाधी आहे.