नागपूर : थेट परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात गेल्या अडीच वर्षांत क्रमांक एकवरच आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. कोणते उद्योग गेल्या दोन-अडीच वर्षांत आले, त्यातून किती कोटींची गुंतवणूक आली व किती रोजगार मिळणार आहे याचा लेखाजोखाच त्यांनी सादर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Anil Deshmukh Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ

राहुल गांधी यांनी केलेले आरोप फडणवीस यांच्या कार्यालयाने आकडेवारी सादर करत खोडून काढले. गुजरातला उद्योग पळाले, सात लाख कोटींची गुंतवणूक तिकडे गेली हे बेछूट आरोप हास्यास्पद आहेत. हा मविआचा नवा ‘फेक नरेटिव्ह’ असून गुजरात थेट परकीय गुंतवणुकीबाबत सहाव्या-सातव्या क्रमांकावर आहे व महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे, असे फडणवीस म्हणाले. प्रकल्पांची यादी खूप मोठी आहे. ७ हजार कोटींच्या परकीय गुंतवणुकीतील ५२ टक्के फक्त महाराष्ट्रात आली आहे. देशात सर्वांत जास्त पायाभूत सेवा प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू आहेत, असे ते म्हणाले. एखादा उद्योग दुसऱ्या राज्यात गेला म्हणून विरोधक ओरड करतात. अनेक उद्योग असेही आहेत की ज्यांच्याबाबत स्पर्धा होती. तामिळनाडू, कर्नाटक, गुजरातसह अनेक राज्ये स्पर्धेत असतानाही या उद्योगांनी महाराष्ट्राला पसंती दिली. उद्योगअनुकूल वातावरण, सवलती जिथे उत्कृष्ट आहेत तिथेच उद्योग जातात आणि म्हणूनच त्यांची पसंती महाराष्ट्राला असते, असे फडणवीस म्हणाले.