नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भात पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विदर्भातील जनतेला काम करवून घेण्यासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून नागपुरात एक विशेष अधिकारी नियुक्त केले जाणार आहे. जनतेची कामे जलद गतीने व्हावी म्हणून नागपुरातील शासकीय निवासस्थान राजगड येथे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक आज विजयगड घेतली. यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. पक्ष वाढीचा एक भाग म्हणून एक उपमुख्यमंत्री कक्ष नागपुरात असावे, अशी कल्पना त्यांना आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात कार्यालय असून त्यांचे येथे विशेष कार्यसीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरात कार्यालय सुरू करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो”, विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक

तसेच एक विशेष कार्यसिन अधिकारी नियुक्त करणार आहेत. दरम्यान, नागपूर शहरातील पक्षसंघटनेची सद्यस्थिती अजित पवार यांनी जाणून घेतली. सोबतच नागपूर शहर आणि परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी व तक्रारींची निवेदने स्वीकारण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात संघटनेची क्षमता अधिक प्रभाविपणे प्रतिबिंबीत होण्यासाठी अजित पवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य महिला आयोग सदस्य आभा पांडे, ओबीसी सेल राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, शहराध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur deputy cm ajit pawar office to be opened soon rbt 74 css
Show comments