नागपूर : अवकाळी पावसाच्या बाबतीत आम्ही सगळीकडे लक्ष ठेवून आहे. जिथे नुकसान झाले तेथे सरकार मदत करेल, त्याच बरोबर पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देखील आम्ही दिलेले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दुपारी नागपुरात आले असता ते विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्यात अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाईल. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नुकसान होईल त्या ठिकाणी आपण मदत करतोच पण नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील सतर्कता ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : गृहमंत्रालयाचे नकारात्मक धोरण मूळावर, पहिल्या महिला बटालियनची राज्याला अद्यापही प्रतीक्षा

संजय राऊत कोण?

शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर विचारले असता हे संजय राऊत कोण असे वक्तव्य करत त्यावर त्यांनी बोलणे टाळले.

Story img Loader