नागपूर : छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची आहे. ते ओबीसी समाजाचे नेते असून त्यांना समाजाचे संरक्षण करण्याचे अधिकार आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे आहोत. ओबीसी मुद्यावर आम्ही एकत्र आहोत, अशा शब्दात अन्न व औषधी विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भुजबळ यांची पाठराखण केली. नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

लाथ मारण्याची भाषा ज्यांनी केली त्यांचा…

छगन भुजबळ यांनी जी भूमिका मांडली, ती ओबीसी समाजासाठी आहे. त्यांच्याबाबत लाथ मारण्याची भाषा ज्यांनी केली, त्यांचा मी निषेध करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसीवर अन्याय नको, अशी सरकारची भूमिका आहे. त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्याशी यावर चर्चा करतील, असेही आत्राम यांनी सांगितले.

Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

हेही वाचा : गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा तलावावर विदेशी पक्ष्यांची शाळा, संपूर्ण परिसर पक्षीमय; रेड क्रेस्टेडच्या संख्येत लक्षणीय वाढ

रोहित पवारांच्या ईडी चौकशीबद्दल काय म्हणाले अत्राम?

रोहित पवार यांच्याकडून काही कागदपत्र हवी असल्यामुळे त्यांना ईडीकडून बोलविले जात आहे. मात्र ते ज्या पद्धतीने इव्हेंट करत आहेत, त्यातून काही साध्य होणार नाही. ईडीच्या कारवाईला मी भीत नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. आता नोटीस आली तर त्यांनी उत्तर द्यावे, असेही आत्राम म्हणाले.

गडचिरोलीच्या जागेवर दावा

गडचिरोलीच्या जागेबाबत मी माझी इच्छा व्यक्त केली आहे, महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील. राज्यात ४५ वर उमेदवार निवडून आणायचे महायुतीचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांची सर्वच गुन्हे घेण्याची मागणी असली तरी काही गुन्हे मागे घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे. पण सगळेच गुन्हे सरकार मागे घेऊ शकत नाही, असेही आत्राम यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यात गोंदिया जिल्हा अव्वल

शरद पवार पक्षाचे सक्रिय सदस्य नाहीत!

अजित पवार हे आमच्या गटाचे नेते असून ते पक्षाचे प्राथमिक सदस्य आहेत. शरद पवार सदस्य नाहीत. ते सांगत होते, आदेशही देत होते, पण ते पक्षाचे सक्रिय सदस्य नाहीत. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार सोडून इतर आमदारांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे, असेही आत्राम म्हणाले.