नागपूर : राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार ७५ हजार पदांची भरती केली जाणार आहे. राज्यात सत्ताबदलानंतर शिंदे- फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट- ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. विविध पदांच्या जाहिराती आल्या असून भरतीही पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता जिल्हा न्यायालयामधील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून दोन विद्यार्थ्यांनी संपविले जीवन

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील ४६२९ पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती २०२३ जाहीर झाली आहे. सदर भरतीची तपशीलवार अधिसुचना जाहीर करण्यात आली. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार ४ डिसेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. जिल्हा न्यायालय भरती २०३ अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसूचना ४ डिसेंबर रोजी जाहीर झाली आहे. पदांची नावे- लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल ही असून अर्ज करण्यास अधिकृत संकेतस्थळ http://www.bombayhighcourt.nic.in हे असून यावर अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur district court recruitment for 4629 posts last date to apply 18 december dag 87 css