नागपूर : नागपूर शहर आणि ग्रामीण भागात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार हा घातवार ठरला आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत, मंगळवारी सकाळीच दहा वाजता सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी जाणारी बस उलटल्याने एक विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. बसमधील शिक्षिकेसह अन्य ४४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. हा अपघात पेंढरी-देवळी परिसरातील वळणावर झाला. निर्वाणी ऊर्फ सई बागडे (१६) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.

दुसऱ्या घटना हा खैरी मार्गावरील कामठी-नागपूर महामार्गावरील महिंद्रा शोरूमसमोर झाला.पुलाखाली उभ्या असलेल्या क्रेनला भरधाव ऑटोने धडक दिली. या विचित्र अपघातात ऑटोतील दोन महिला जागीच ठार झाल्या तर ऑटोचालकासह सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निर्मला लक्ष्मण जुमडे (५०, रा तांडापेठ, वैशालीनगर) आणि कौशल्या कुहीकर (६०, प्रेमनगर) असे अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तर ऑटोचालक सतीश गोमकाळे, दुर्गा नरेंद्र वैरागडे (६०, तांडापेठ), बेबीबाई मोतीराम आसोले (६०,तांडापेठ), इंदूमती भैसारे (६०, वैशालीनगर), विमला गोपाल धने (६०, तांडापेठ), रेखा पराते (६०, चंद्रभागानगर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

हेही वाचा : भंडारा : महायुतीचा उमेदवार हरला, तरी भाजप जिल्हाध्यक्षाचे अभिनंदन…ध्वनिफितीतील संवादामुळे…

एका लग्न समारंभात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी निर्मला जुमडे, कौशल्या कुहीकर , दुर्गा वैरागडे, बेबीबाई आसोले , इंदूमती भैसारे, विमला धने आणि रेखा पराते यांना जायचे होते. त्यांनी ऑटोचालक सतीश गोमकाळेने मगंळवारी सांयकाळी पाच वाजता खैरी मार्गाने जात असताना महिंद्रा शोरूमसमोर उभ्या असलेल्या क्रेनला भरधाव ऑटो धडकवला. या अपघातात निर्मला आणि कौशल्या या दोघीही जागीच ठार झाल्या. तर ऑटोचालक सतीशसह अन्य पाच महिला गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच नागरिकांनी ऑटोतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नवीन कामठी पोलिसांनी आरोपी ऑटोचालक सतीश गोमकाळेविरुद्ध हयगयीने वाहन चालवून दोन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल केला. अपघातास कारणीभूत ठरलेली क्रेन रस्त्याच्या मधोमध उभी होती. त्यामुळे क्रेनचालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री देवाभाऊच!’ नागपुरात भाजप महिला आघाडीचे टेकडी गणपतीला साकडे..

भरधाव कार कठड्यावर आदळून युवक ठार

भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर रस्त्यावरील कठड्याला (रेलिंग) धडकली. या विचित्र अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मित्र गंभीर जखमी झाले. ही घटना कामठी-नागपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, लोखंडी दांडा कारच्या समोरील भागातून शिरून आरपार मागच्या भागातून बाहेर निघाली़ या अपघातात रोशन निलांबर नाइक (२६, रा़ तिरंगा चौक, रामगड, नवीन कामठी) हा ठार झाला तर सय्यद आमीर शहजाद सय्यद साबीर (२६, फुटानाओळी, कामठी) व अभिषेक शिवनारायण परमान (२८, रा़ नवीन येरखेडा, दुर्गा सोसायटी, कामठी) हे दोघे गंभीर जखमी झाले़.

Story img Loader