नागपूर : प्रेम असल्याचे सांगून एका युवकाने प्रेयसीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती झाली. मात्र, प्रियकराने ‘तो मी नव्हेच,’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने कन्हान पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी कन्हानजवळील एका गावात राहते. तिची ओळख सप्टेंबर २०२२ मध्ये गावातील आरोपी विशाल गोपाळराव तिरकमठे (२३) याच्याशी झाली. त्याने तिच्याशी मैत्री वाढवली. घरी कुणी नसताना तो वारंवार तिच्या घरी येत होता.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार

हेही वाचा – “तुरुंगात मला पाणी मिळालं नाही, कारण…”, नवनीत राणांनी सांगितला डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग

हेही वाचा – राणा दाम्‍पत्‍य उभारणार १११ फुटांची विशाल हनुमान मूर्ती

यादरम्यान, त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. त्याने जंगलात नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार तिला बाहेर नेत होता. तसेच घरी कुणी नसताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. यातून ती गर्भवती राहिली. चार महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे तिचे पोट वाढल्याचे आईच्या लक्षात आले. आईने तिला विचारणा केली असता तिने प्रियकर विशाल तिरकमठे याचे नाव सांगितले. तो लग्न करणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे तिच्या आईने विशालला घरी बोलावले. मात्र, प्रियकराने ‘त्या बाळाचा बाप मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे तरुणी रडायला लागली. आईने मुलीसह कन्हान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून विशालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.