नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते अधिक महत्त्व २०१४ मध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर आले. नागपूर हे राज्याचे केंद्रबिंदूच ठरले. अशा जिल्ह्यातील सर्वच निवडणुकीकडे प्रत्येक घटकांचे लक्ष असणे स्वाभाविकच. त्यात विधानसभा निवडणुका म्हंटल्यावर रिंगणातील उमेदवारांची चर्चा अधिक होते. नागपूर शहरात व जिल्ह्यात प्रत्येक सहा या प्रमाणे १२ मतदारसंघ आहेत. त्यात तब्बल २१७ उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणूक लढवणा-यांमध्ये भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत, विद्यमान आमदार विकास ठाकरे यांचा समावेश आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील काटोल मधून व माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या सावनेरमधून निवडणूक लढवत असल्याने देशमुख व केदार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

assembly electio
भाजपकडून विद्यमान आमदारांनाच संधी, आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Assistant Commissioners, Public Service Commission,
लोकसेवा आयोगाने सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस यादी केली जाहीर, अवमान याचिका दाखल केल्यानंतर आयोगाची सावध भूमिका
polling stations Pune district, Pune district remote areas, Pune, Pune latest news,
पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना
article 324 to 329 of part 15 of constitution contains provisions regarding elections
संविधानभान : निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात?
Raj Thackeray MNS Third List
MNS List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, आणखी १३ जणांना तिकिट
Mahayuti Candidate List 2024 in Marathi| Mahayuti Declared 182 Seats for Maharashtra Assembly Election 2024
Mahayuti Candidate List 2024 : महायुतीच्या १८२ जागा जाहीर, महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोडं अडलेलंच!
Arms were seized in an all out operation by the Dhule District Police
धुळे: अबब…१६ तलवारी, ६ बंदुका, ८ जिवंत काडतुसे आणि…

हेही वाचा…यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…

नागपूर जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सर्व मतदारसंघ मिळून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या २१७ इतकी असल्याचे निवडणूक विभागाने कळवले आहे.

काटोल मतदारसंघात २२ अर्ज आले होते. पाच जणांनी अर्ज मागे घेतले असून १७ उमेदवार मैदानात आहेत. सावनेरमध्ये २१ अर्ज आले होते. ३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता १८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. हिंगण्यात २६ अर्ज दाखल झाले होते. ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता १८ उमेदवार रिंगणात आहेत. उमरेडमध्ये २२ अर्ज दाखल झाले.११ उमेदवारांनी माघार घेतली. ११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात १३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी फक्त एकाने अर्ज मागे घेतला. १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा…‘भाजप’कडून फराळ वाटप नियमात, मात्र संविधान जागर नियमबाह्य.. हा कोणता कायदा?

दक्षिण नागपूरमध्ये २४ अर्ज होते. दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता २२ उमेदवार रिंगणात आहेत. पूर्व नागपूरमध्ये २३ जणांनी अर्ज दाखल केले होते. सहा जणांनी माघार घेतली. आता १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मध्य नागपूरमध्ये ३२ अर्ज आले होते. १२ उमेदवारांनी माघार घेतली. २० उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा…अमरावती जिल्हयात अनेकांच्‍या तलवारी म्‍यान…पण, सात बंडखोर मात्र…

पश्चिम-नागपूरमध्ये २३ अर्ज दाखल झाले होते. तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला असून आता २० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. उत्तरमध्ये ३० अर्ज होते. चौघांनी माघार घेतली तर २६ उमेदवार रिंगणात आहेत. कामठीत २९ अर्ज आले होते. १० जणांनी अर्ज मागे घेतले, १९ रिंगणात आहेत. रामटेकमध्ये २४ अर्ज आले होते. ७ उमेदवारांनी माघार घेतली, १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मतदारसंघ दाखल अर्ज माघाररिंगणात
काटोल२२१७
सावनेर२११८
हिंगणा२६०८
उमरेड२२११११
दक्षिण-पश्चिम१३०११२
दक्षिण नागपूर२४०२२२
पूर्व नागपूर२३०७१७
मध्य नागपूर३२१२२०
पश्चिम नागपूर२३०३२०
उत्तर नागपूर३००४२६
कामठी२९१०१९
रामटेक२४०७१७