नागपूर : एका तरुणीची छेडखानी केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक आरोपीच्या घरी गेले. आरोपी बापलेकांनी दारात पोलीस दिसताच अश्लील शिवीगाळ करून पोलिसांच्या अंगावर ग्रेडडेन जातीचा कुत्रा सोडला. कुत्र्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांचे लचके तोडले. हे दृष्य बघून अन्य पोलिसांनी घटनास्थळावरुन पळ काढला. शेवटी पोलिसांनी कुत्र्याच्या तावडीतून सुटल्यानंतर बापलेकांना अटक केली. अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी (३७) आरोपी मुलाचे तर पिंटू नंदलालजी बागडी (६५, रा. ईतवारी, सराफा मार्केट, वैशाली साडी सेंटर समोर) असे आरोपी वडिलांचे नाव आहे.

अंकुश बागडी हा विकृत स्वभावाचा आहे. त्याने एका तरुणीसोबत अश्लील चाळे केले. त्या तरुणीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आरोपी अंकुशला पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, तो ठाण्यात आला नसल्यामुळे मंगळवारी रात्री १०.३० वाजता पोलीस हवालदार संजय रामलाल शाहू आणि त्यांचा एक सहकारी पोलीस कर्मचारी हे अंकुशच्या घरापुढे आले.

ias Shubham Gupta lokjagar
लोकजागर: पूजा खेडकर ते शुभम गुप्ता!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
couple attempt to commit suicide by jumping into kanhan river
नागपूर : पती-पत्नीने कन्हान नदीत घेतली उडी…
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

हेही वाचा : मूल होत नसल्याने पत्नीचा खून केला आणि मृतदेहाजवळ तब्बल सहा तास…

त्यांनी अंकुशला आवाज दिला. आवाज ऐकून अंकुश आक्रमक दिसणारा पाळीव कुत्रा घेऊन घराबाहेर आला. हवालदार संजय यांनी आरोपीला ओळख दिली आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. त्याला अटकेची भीती वाटली. त्यामुळे वडिलाला बोलावून घेतले.

आवाज ऐकून अंकुशचे वडील पिंटू नंदलालजी बागडी (७३) घराबाहेर आले. त्यांनीही पोलिसांना अटकाव करत शिवीगाळ केली. दरम्यान, हवालदाराने वडील पिंटू बागडी यांना बाजुला होण्यास सांगितले. अंकुशला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अंकुशने त्याचा पाळीव कुत्रा हवालदाराच्या अंगावर सोडला.

हेही वाचा : चंद्रपूर,गोंदिया,वर्धा, यवतमाळसह राज्यात या शहरात सुरू होणार खाजगी एफ. एम. सेवा

आक्रमक कुत्र्याने हवालदाराच्या अंगावर उडी घेतली. त्यामुळे घाबरेल्या हवालदाराने सहकारी कर्मचाऱ्यासह तेथून पळ काढला. मात्र, कुत्र्याने हवालदाराचा पाठलाग करून त्यांचा लचका तोडला. कुत्र्याने हवालदाराच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. शाहु यांच्यासोबत असलेल्या पोलीस अंमलदाराने हवालदाराला वाचविण्याकरिता कुत्र्यावर लाठी उगारली. मात्र, कुत्र्याने दुसऱ्याही पोलिसाच्या अंगावर धाव घेतली. कुत्र्याची आक्रमकता बघून दुसरा पोलीस कर्मचारी पळून गेला. काही वेळानंतर दोघेही परत आले आणि त्यांनी नगारिकांच्या मदतीने बापलेकाला ताब्यात घेतले. संजय शाहू यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या प्रकरणी संजय शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक मादेवार यांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करत आरोपी बापलेकाला अटक केली.