नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावरच कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे (४२) रा. नेमसेडा, चांदुरबाजार, अमरावती असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अगोदर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. सद्यस्थितीत ते सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या वाहनावर चालक म्हणून नेमणूकीस आहे.

हेही वाचा…पहिल्या दिवशी एकपाळ्याच्या दारात, दुसऱ्या दिवशी तिकीट आली घरात; खासदार म्हणतात, “हा मारोती पावतोच मला…”

शुक्रवारी त्यांनी सकाळी एसीपींना कपिलनगर पोलीस टाण्यात सोडले. त्यानंतर ते पोलीस ठाण्याच्या परिसरात गाडी साफ करत होते. त्यावेळी दिलीप रामराव चिनकुरे (५३) रा. एन.आय.टी क्वॉर्टर, कपिलनगर हा तेथे पोहोचला. त्याने थेट धर्माळे यांच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर वार केले. त्यात धर्माळे जखमी झाले. त्यात धर्माळे जखमी झाले. त्याने तिसरादेखील वार केला. मात्र धर्माळे यांनी तो चुकवला व आरोपीला जोरात धक्का दिला. जखमी धर्माळे यांची आरडाओरड ऐकून पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी धावत आले व त्यांनी आरोपीला पकडले.

हेही वाचा…वर्धा : संपत्तीचा वाद; बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या

धर्माळे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात दिलीपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी मानसिक रुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur driver of assistant commissioner of police attacked with axe accused detained mnb 82 psg