नागपूर : युगांडाहून दोहामार्गे कतार एअरवेजच्या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी आणण्यात आलेले ८.८१ कोटी किंमतीचे २.९३७ किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभागाने चेन्नई येथील मूळ रहिवासी असलेल्या एका ४५ वर्षीय प्रवाशाला गुरुवारी पहाटे ३ वाजता अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला ग्रीन चॅनलवरून जात असताना अडवले. त्याची कसून तपासणी केली. त्याच्याकडील सामानात एक डमी प्रोपेलर आणि दोन प्लेट आकाराच्या डिस्कसह संशयास्पद वस्तू सापडल्या. डमी प्रोपेलर व डिस्क उघडली असता त्यामध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पावडर भरलेले आढळून आले. या पावडरमध्ये मेथाक्वॉलोन हा अंमली पदार्थ आढळला.

हेही वाचा : अकोल्यात भाजपमध्ये बंडखोरी, माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांचा अर्ज दाखल

ही कारवाई सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पथकाचे नेतृत्व सहायक आयुक्त चरणजीत सिंग आणि अंजुम तडवी यांनी केले. अधीक्षक मनीष पंढरपूरकर, प्रकाश कापसे, अंजू खोब्रागडे, राजेश खापरे, निरीक्षक आदित्य बैरवा, विशाल भोपटे, अभिजित नारुका, प्रियंका मीना, कृष्णकांत ढाकर, हवालदार शैलेंद्र यादव यांचा पथकात समावेश आहे.