नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई -मेल जर्मनीहून आल्याची माहिती समोर आली. गेल्या सोमवारी नागपूर विमानतळ प्रशासनाला एक ई-मेल प्राप्त झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली तर तपास यंत्रणाही सतर्क झाल्या होेत्या. आता तपासादरम्यान हा मेल जर्मनीहून आल्याची बाब समोर आली आहे.
हेही वाचा : नागपूर: दुर्दैवी… विजेचा धक्का लागून चिमुकलीसह दोघांचा मृत्यू
विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा ईमेल येताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथक (डॉग स्वॉड) विमानतळावर तैनात करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलही (सीआयएसएफ) सतर्क झाले आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच विमानतळाच्या वाहनतळावरील सर्व वाहनांची कसून तपासणी केली गेली. तसेच विमानतळाच्या चारही बाजूंनी सुरक्षा वाढण्यात आली असून गस्त घालण्यात येत आहे.