नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या उपराजधानीत दर दिवशी दोन महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचार होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. गेल्या तीन महिन्यांत महिलांवर अत्याचार झाल्याच्या २४७ घटना उघडकीस आल्या आहेत.

पोलिसांचा वचक संपल्यामुळे नागपुरात गुन्हेगारांची संख्या आणि गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. सध्या महिलांवरील लैंगिक अत्याचारासह कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग, छेडखानी, अश्लील चाळे, शेरेबाजी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. यापूर्वी महिला व वृद्धांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला होता.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

हेही वाचा : वाशिम : लग्नसमारंभासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन ठार

मात्र, महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे पोलिसांचा दावा हवेत विरला आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातील माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांवर बलात्कार केल्याच्या ७२ घटना उघडकीस आल्या आहेत. या आकड्यावरून वर्षाअखेरपर्यंत हा आकडा साडेतीनशेपार जाण्याशी शक्यता आहे.

यासह काही प्रकरणांमध्ये तरुणी, मुली, महिला लैंगिक शोषण झाल्यानंतर बदनामी किंवा कुटुंबाच्या दबावातून तक्रार देण्यास समोर आल्या नाहीत. तसेच तरुणी-महिलांशी अश्लील चाळे किंवा विनयभंग केल्याचे ११४ गुन्हे दाखल आहेत. पीडितांमध्ये तरुणींसह अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. लग्न होऊन घरात नांदायला आलेल्या सुनेवरही शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. जानेवारी ते मार्च महिन्यांत कौटुंबिक हिंसाचाराचे ६१ गुन्हे घडले आहेत.

हेही वाचा : नागपूर : कुणाल बॅटरीचा भरचौकात खून

नागपूर पोलिसांनी महिलाविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरात गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्यामुळे टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून टोळीयुद्ध सुरु झाले आहे. गेल्या तीन वर्षांत २६० हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ४० टक्के घटना टोळीयुद्धातून किंवा वर्चस्वाच्या वादातून झाल्या आहेत. गेल्या जानेवारी ते मार्च महिन्यांत नागपुरात २० हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी गुन्हे शाखेला वचक निर्माण करायला लागणार आहे.

महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी

वर्ष -बलात्कार -विनयभंग -कौटुंबिक हिंसाचार
२०२१ -२३४- २५६- १७७
२०२२ -२५०- ३४०- २३५
२०२३ -२६३ -५०६ -२८२
२०२४ (मार्च) -७२- ११४- ६१