नागपूर : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. प्राजक्ता ज्वेलरी शाॅपिंग फेस्टिव्हलची घोषणा करण्यासाठी सोमवारी (१६ ऑक्टोबर) नागपुरातील हाॅटेल तुली इंपेरियरमध्ये आली होती. याप्रसंगी तिने नागपुरात आली तर ‘सावजी’वर ताव मारणारच असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, जुळून येती रेशीमगाठी’ या खासगी दुरचित्रवानीवरील कार्यक्रमांमुळे प्राजक्ता घराघरात पोहचली आहे. तिचे चित्रपटातील अभिनयही रसिकांना खूप आ‌वडतात. नागपुरात प्राजक्ता पुढे म्हणाली, नागपुरातील सावजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विविध पदार्थाची चव नेहमीच आवडते. त्यामुळे आता नागपुरात आली असल्यामुळे या खाद्य पदार्थांवर मनसोक्त ताव मारणार आहे.

हेही वाचा : वाशिम : सरकारकडून पदवीधर बेरोजगारांची थट्टा, आमदार धीरज लिंगाडे म्हणतात, कंत्राटी भरती…

मला सोन्या- चांदीसह इतर धातूचे दागीने खूप आवडते. नत हा दागीना माझा आवडता आहे. आपल्याकडे पारंपारीक पद्धतीने काही दागीने पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होते. त्यामुळे या दागिन्यांना सांस्कृतिक महत्वही आहे. पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असल्याचे बोलले जात होते. परंतु आताही विविध दागिन्यांमध्ये भारत पुढे असून या दागिन्यांना जगभरात मागणी असल्याचेही प्राजक्ता माळी यांनी सांगितले. याप्रसंगी ऑल इंडिया जेम ॲन्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)चे उपाध्यक्ष राजेश रोकडे, संयुक्त संयोजक मनोज झा, माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur famous marathi actress prajakta mali ate saoji food during her visit to announce prajakta jewellery shopping festival mnb 82 css
Show comments