नागपूर : पोळा हा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा सन आहे. या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्याची पूजा करतात. वर्धा जिल्ह्यातील जयपूर गावातील शेतकऱ्याने या सणात उत्सवाचा बेत रचला होता. पण दुर्दैवाने पोळ्याला त्यांचा मेंदू मृत झाल्याचे पुढे आले. नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. या अवयवांच्या प्रत्यारोपणातून सहा कुटुंबात प्रकाशाची पेरणी झाली आहे.
अमित पाटील (वय- ४८ वर्ष) हे पोलीस पाटील होते. ते जिल्हा ग्रामीण मजूर पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष असल्याने सामाजिकदृष्ट्या सक्रिय होते. तंटामुक्ती समितीमध्येही त्यांनी १० वर्षे काम केले. सेलू तालुका येथील प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांना कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचे पुरस्कार सुद्धा मिळाले आहे. १२ सप्टेंबरला अमित यांना सकाळी उलट्या सुरू झाल्या. प्रकृती खालवल्यावर त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. या प्रसंगी ब्रेन हॅमरेज झाल्याचे पुढे आले.
हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात संततधार, तीन धरणांचे दरवाजे उघडले; सतर्कतेचा इशारा
विविध तपासण्यांमध्ये त्यांचा मेंदू मृत झाल्याचे पुढे आले. रुग्णालयातील डॉक्टरांसह विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने नातेवाईकांचे अवयव दानाबाबत समुपदेशन केले. नातेवाईकांनी होकार दर्शवतात कायदेशीर प्रक्रिया करून प्रतीक्षा यादीतील रुग्णाची माहिती मिळवली गेली. त्यानंतर फुफ्फुस विमानाने अहमदाबाद येथे पाठवून तेथील रुग्णात प्रत्यारोपित केले गेले.
हेही वाचा : बावनकुळेंनी खोटे बोलणे थांबवावे, मर्यादेत राहून बोलावे; शरद पवार गटाने सुनावले
तर यकृत नागपुरातील न्यू इरा रुग्णालयातील एक रुग्ण, एक मूत्रपिंड वर्धेतील याच रुग्णालयातील रुग्णात तर दुसरे मूत्रपिंड नागपुरातील खासगीच्या रुग्णात प्रत्यारोपित केले गेले. तर दोन्ही बुब्बुळ तेथील नेत्र पिढीला दिले गेले. त्यातूनही पुढे दोन अंध बांधवांना दृष्टी मिळनार आहे.