नागपूर : बजाजनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या पायातून बंदुकीची गोळी आरपार गेली होती. या प्रकरणात सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून गोळी सुटल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु पोलीस चौकशीत संकेत यांच्यावर गोळी झाडल्याचे पुढे आल्याने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ५ मे २०२२ ला गणवेश घालताना सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडल्याने गोळी सुटली व ती डाव्या पायातून आरपार जाऊन उजव्या पायात फसली. बजाजनगर पोलिसांनी मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ, वीरसेन धावले, कोमल गायकवाड, डॉ. सुधीर देशमुख यांचे म्हणणे नोंदवले. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. चौकशीदरम्यान संकेत आणि इतरांनीही दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे पुढे आले. गोळी सुटली नाही तर झाडली गेली, त्यामुळे त्यांचा खून करण्याचा प्रयत्न होता काय, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक
An attempt by the accused in the Bopdev Ghat case to mislead the police Pune news
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

हेही वाचा : खोटे आरोप करणाऱ्या महिला शिपायास निलंबित करा, हे समाजासाठी घातक; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा…

दरम्यान, एका महिला अधिकाऱ्याने यापूर्वी आरटीओतील एका मोठ्या अधिकाऱ्याला खोट्या तक्रारीत अडकवण्यासाठी तक्रार दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे तार त्या घटनेशी जुळल्याचीही चर्चा आरटीओतील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या विषयावर नागपूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गोळी सुटली नसल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत असल्याचे चौकशीत दिसत असल्याचे मान्य केले. याबाबत बजाज नगर पोलिसांत तक्रारही दिल्याची माहिती त्यांनी दिली. बजाजनगर पोलीस निरीक्षकांनी खूप व्यस्त असल्याचे सांगत बोलणे टाळले.

हेही वाचा : राज्य कुस्ती स्पर्धेत आज महाराष्ट्र केसरी भिडणार; ऑलिम्पियन अमित दहिया, अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांची उपस्थिती

प्रकरण काय?

बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ५ मे २०२२ ला मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. संकेत घरून कर्तव्यावर जाण्यासाठी गणवेश परिधान करतांना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. त्यामुळे त्या गडबडीत रिव्हॉल्वर डाव्या बाजूला खाली पडून त्यातील बुलेट फायर झाली. ही बुलेट त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरी मध्ये जाऊन फसल्याचा संकेतचा दावा होता. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यावर वेगळाच प्रकार पुढे आला.