नागपूर : पूर्व नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूरला जोडण्यासाठी व या भागात होणारी वाहन कोंडी लक्षात घेता पाच नवे उड्डाण पूल बांधण्यात येणार असून त्यासाठी ७९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पूर्व , मध्य नागपूरला दक्षिण नागपूरशी जोडणाऱ्या रस्त्यांवर होणारी वाहनकोंडी व त्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता तेथे उड्डाण पुल बांधण्याची मागणी या भागातील आमदारांनी केली होती.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा! लोकसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले पत्र
‘महारेल’ कंपनीने याबाबत प्रस्ताव तयार केले होते. प्रस्तावित उड्डाण पुलांमध्ये रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट (२५१ कोटी), चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक (६६कोटी), लकडगंज पोलीस ठाणे ते वर्धमाननगर (१३५ कोटी), नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक (६६ कोटी) आणि वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड (२७४कोटी) आदींचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या एकूण ७९२ कोटी रुपयांस शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १९ ऑक्टोबरला नगरविकास विभागाने काढला.