नागपूर : जी-२० ची एक बैठक (सी-२०) मार्च महिन्यात नागपुरात पार पडली. त्यानिमित्त शहर सौंदर्यीकरणावर एक महिन्यात १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. चार महिन्यातच या सौदर्यीकरणाचे तीन तेरा वाजलेले दिसतात. जी-२० फलकाचा वापर वाहतक कठडे म्हणून केला जातो, नाले झाकण्यासाठी लावलेले कापड हवेने ऊडून गेले, रस्ते पहिल्या पावसातच खराब झाले. शाबूत आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरालगतची कारंजी.
हेही वाचा : नागपूर : कोट्यवधींची उलाढाल असलेल्या दहीहंडी उत्सवाचे राजकीयीकरण, नेत्यांकडून शक्तिप्रदर्शनासाठी जय्यत तयारी
नागपुरातील बैठकीच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात जी-२० चे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. ते वादळामुळे पडले, त्याचा वापर आता वाहतूक पोलीस कठडे म्हणून करू लागले आहेत. छत्रपती चौकात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. येथे जी-२० च्या प्रचार फलकाचा वापर वाहतूक कठडे म्हणून केला जात आहे.