नागपूर : नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात सातत्याने बदल होतांना दिसत आहे. नववर्षात सोन्याचे दर वाढण्याची गती वाढल्याने प्रथमच हे दर नवीन उच्चांकीवर पोहचले आहे. सोन्याचे वाढते दर बघून लग्नासह इतर समारंभानिमित्त दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कुटुंबियांमध्ये चिंता वाढली आहे. सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपूरसह राज्याच्या विविध भागात हल्ली लग्न, वाढदिवसासह इतरही कार्यक्रमांचे आयोजन वाढले आहे. या कार्यक्रमात आजही अनेक नागरिक सोने- चांदीचे दागिने वा इतरही वस्तू भेट देत असतात. त्यामुळे आता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. या ग्राहकांकडून लग्न असल्यास मंगळसूत्र वा इतर दागिने, बारसे असल्यास बाळासाठी चाळ तर इतरही ग्राहकांकडून विविध कार्यक्रमानुसार दागिन्यांना मागणी आहे.

Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Who is Saif Ali Khan attacker lawyer
Saif Ali Khan Attack: “तो मी नव्हेच..”, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा दावा; वकिलांनी काय माहिती दिली?
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Two leopards at transit treatment center found to be infected with Avian Influenza H5N1 virus
वाघांपाठोपाठ बिबट्यानाही “बर्ड फ्ल्यू”, प्राणिसंग्रहालय, बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”

दरम्यान, नववर्षात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. परंतु शुक्रवारी २४ जानेवारीला सोन्याच्या दरात बदल झाला. आता सोन्याचे दर चढतीवरच आहे. नागपुरातील सराफा बाजारात नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७६ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार रुपये नोंदवले गेले होते. हे दर २४ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८० हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६२ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५२ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. हे दर एक दिवसापूर्वी २३ जानेवारीला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८० हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६२ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५२ हजार २०० रुपये होते. त्यामुळे राज्यात २३ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत २४ जानेवारी २०२४ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३०० रुपये वाढल्याचे दिसत आहे.

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजारात २३ जानेवारी २०२५ ला चांदीचे दर ९१ हजार ५०० रुपये प्रति किलो होते. हे दर २४ जानेवारी २०२५ रोजी ९१ हजार ९०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे २३ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत नागपुरात २४ जानेवारी २०२५ रोजी चांदीच्या दरात ४०० रुपये प्रति किलो वाढ नोंदवली गेली.

Story img Loader