नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठ्या कपातीच्या घोषणेनंतर नागपूरसह देशभरात सातत्याने सोने- चांदीचे दर घसरत होते. परंतु आता या धातूचे दर वाढू लागले आहे. दरम्यान गुरूवारी (१ ऑगस्ट) पुन्हा २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम सत्तर हजारांहून जास्तवर पोहचले आहे. त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.

नागपुरातील सराफा बाजारात गुरूवारी (१ ऑगस्ट) सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. हे दर बुधवारी (३१ जुलै) सकाळी १० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ४०० रुपये होते.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक

हेही वाचा : दूषित पाणी पुरवठा ग्रामस्थांच्या जीवाववर! गोंदियाच्या नवेगावबांधमध्ये ६० गावकऱ्यांना अतिसाराची लागण

दरम्यान बुधवारच्या (३१ जुलै) तुलनेत गुरूवारी (१ ऑगस्ट) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ प्रति दहा ग्राम २४ कॅरेट सोन्यामध्ये ४०० रुपये, २२ कॅरेट सोन्यामध्ये ४०० रुपये, १८ कॅरेट सोन्यामध्ये ४०० रुपये, १४ कॅरेट सोन्यामध्ये २०० रुपये आहे. दरम्यान हल्ली काही प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी लवकरच हे दर आणखी जास्त वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या सोन्यात ग्राहकांसाठी गुंतवणीकीची चांगली संधी असल्याचे या व्यवसायिकांचे म्हणने आहे. दरम्यान नागपुरात प्लॅटिनमचे दरही सोमवारी प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये होते. हे दर अर्थसंकल्पापूर्वी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम होते.

अर्थसंकल्पानंतर दर घसरल्यावर हे होते दर..

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात अर्थसंकल्पापूर्वीच्या दिवशी सोमवारी (२२ जुलैला) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर अर्थसंकल्प असलेल्या दिवशी अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली. या दिवशी (२३ जुलै) संध्याकाळी नागपुरातील सराफा बाजार बंद होतांना २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले.

हेही वाचा : हृदय, यकृत प्रत्यारोपण नि:शुल्क; नागपूरच्या सुपरस्पेशालिटीत गरीब, मध्यमवर्गीयांना मिळणार लाभ

हे आहेत चांदीचे दर..

नागपुरातील सराफा बाजारात अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर (२३ जुलै) रात्री बाजार बंद होतांना चांदीचे दर प्रति किलो ८५ हजार ८०० रुपये होते. हे दर १ ऑगस्टला ८४ हजार ७०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले.