नागपूर: मैत्रिणीसह महाविद्यालयात जात असलेल्या विद्यार्थिनीशी एका गुंडाने बसमध्ये घुसून अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला असता ठार मारण्याची धमकी दिली.

मुलीने लगेच कुटुंबीयांना माहिती देऊन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. सोनू उर्फ गेंडा राजकुमार दांडेकर (२४) रा. भांडे प्लॉट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गेंडा विरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. पकडल्यानंतर गोंधळ घालून तो पोलिसांना चांगलाच त्रास देतो. यापूर्वी त्याने ‘लॉकअप’मध्ये डोके फोडण्याचाही प्रयत्न केला आहे.

हेही वाचा… गडचिरोली : ‘मायक्रोस्कोप’ चोरी प्रकरणात अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात ? जिल्हा हिवताप कार्यालयातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगी बुधवारी दुपारी महाविद्यालयात जात होती. दरम्यान गेंडाने तिचा रस्ता अडवला. तिच्याशी आक्षेपार्ह बोलून मोबाईल नंबरची मागणी केली. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ती बसमध्ये बसली असता गेंडाही बसमध्ये चढला आणि तिच्या शेजारी येऊन बसला. तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. नंबर दिला नाहीतर जिवे मारण्याची धमकीही दिली.

यामुळे मुलगी घाबरली आणि तिने वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. गेंडाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून गेंडाला अटक केली. न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.

Story img Loader