नागपूर: ओबीसी आरक्षण बचाव लढा अधिक व्यापक होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातली. “एकीकडे आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करायचं. दुसरीकडे गावबंदी करायची, आमच्यावर बहिष्कार टाकायचे हे प्रकार संविधानाची पायमल्ली करणारे आहेत”, असं पडळकर म्हणाले. बाबासाहेबांनी ओबीसी हा शब्द पहिल्यांदा वापरल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : प्रियदर्शन देशपांडेचे ‘वेकोली’शी जुळले तार! वेकोलीचे अधिकारी सीबीआयच्या रडारवर

बाबासाहेबांना थेट ओबीसी आरक्षण प्रश्नाशी यशस्वीपणे जोडल्याचं पहायला मिळतंय. कोळी बांधवांना ओबीसी ऐवजी एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातलीये. ओबीसी समूहांची राज्यात मोठी संख्या आहे. सोबतच दलित समूह घेतल्यास सरकारवर मोठा दबाव येऊ शकतो अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur gopichand padalkar said entry ban in villages is against constitution bhimsainik cwb 76 css