नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील ऐतिहासिक इमारती, शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर विद्युत रोषनाई केली जाते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलेल्या भारतात प्रेक्षणीय स्थळे आणि धरणांवरही रोषनाई करण्यात येत आहे. याच बरोबर आता महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणावर लेझर शो दाखवण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर हे धरण उभारण्यात आले आहे. वैनगंगा ही मोठी नदी असून बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. तसेच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा यामुळे होत आहे. या धरणाला इंदिरासागर प्रकल्प किंवा गोसेखुर्द (गोसेखुर्द) प्रकल्प असे म्हटले जाते. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे. धरणाचे भूमिपूजन २३ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी केले होते. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले.

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MHADA offices are now on lease Mumbai news
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
Stones pelted at hawker removal teams vehicle in G ward of Dombivli
डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले
Volumes 1 to 20 of Marathi Encyclopaedia update using modern technology
मराठी विश्वकोशाचे खंड अद्ययावत होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; नवे शब्द, नोंदीची भर

हेही वाचा : तोट्यातील ‘एसटी’ नफ्याच्या उंबरठ्यावर, झाले असे की…

पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होते.

या धरणाच्या एका टोकाहून दुसरीकडे ये-जा करण्याची व्यवस्था आहे. गोसेखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकासाबाबत सामंजस्य करार झाला आहे. हा १०१ कोटी रूपयांचा प्रस्तावित प्रकल्प आहे.

हेही वाचा : नाना पटोले म्‍हणतात,‘महायुतीची लाडकी आमची खुर्ची योजना…’

गोसेखुर्द हे महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प आहे. येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रोषनाई करम्यात आली आहे. तसेच ‘लेझर शो’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाला भारतीय ध्वजातील तिरंग्याचे दर्शन दूरवरून होत आहे. समाज माध्यमावर या लेझर शोची चित्रफित प्रसारित झाली आहे. येथील सुंदर लेझर शो दाखवला आहे. हा लेझर शो म्युझिकल फाउंटेनवर दाखवला जात असल्याने अधिक नयनरम्य वाटत आहे.

Story img Loader