Maharashtra Government Formation Oath Ceremony : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांच्यासाठी नागपूरच्या गोविंद टेलर म्हणजेच पिंटू मेहाडिया यांनी खास चार जॅकेट तयार केले असून ते मुंबईला रवाना झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.येत्या ५ डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस कुठला पोशाख परिधान करणार याकडे लक्ष लागले असताना नागपूरच्या गोविंद टेलर म्हणजेच पिंटू मेहाडिया यांनी त्यांच्यासाठी खास चार जॅकेट तयार केले आहे.

हेही वाचा : गोंदिया जिल्ह्यात नक्षल सप्ताह, पोलिसांची काय आहे तयारी ?

यापूर्वी मॉडेलिंग करताना देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळे पोशाख परिधान केले असताना त्याचे शहरात होर्डींग लावले असताना त्याची चांगलीच चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांत वेगवेगळे जॅकेट परिधान करताना आता शपथविधी सोहळ्यासाठी त्यांच्यासाठी पिंटू मेहाडिया यांनी खास जॅकेट तयार केले आहे. देवेंद्र फडणवीस महापौर असताना त्यांचे कपडे शिवण्याचे काम करत आहे. त्यातही खास जॅकेट शिवण्यासाठी ते प्रसिद्ध असल्यामुळे ते त्यांच्याकडून कपडे शिवत असतात.

हेही वाचा : सरत्या वर्षात अवकाशात फिरत्या चांदणीची पर्वणी

शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी चार वेगवेगळ्या रंगाचे चार जॅकेट बनविण्यात आले असून ते घेऊन गोविंद टेलर मुंबईला रवाना झाले आहे. यावेळी पिंटू मेहाडिया यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत असल्यामुळे आम्हाला आनंद आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मी शिवलेले जॅकेट घालावे अशी अपेक्षा आहे. त्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाल्यावर ते आता मुंबईला आणले आहे. प्रथम आमदार झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडून बंगाली कुर्ता आणि जॅकेट शिवले होते. त्यानंतर त्यापूर्वी महापौर झाले तेव्हाही त्यांनी माझ्याकडून कपडे शिवले होते. जवळपास ३२ वर्षापासून त्यांचे कपडे शिवत आहे. ते सुरुवातीला नियमित जॅकेट घालायचे नाही, कुठला कार्यक्रम असेल तरच ते घालत होते. मात्र पण २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मी शिवलेले जॅकेट घातले होते. तेव्हापासून मी त्यांचे जॅकेट बनवीत असल्याचे त्यांनी सांगितले. आता चार जॅकेट घेऊन ते मुंबई आलो आहे. ते शपथविधी सोहळाच्यावेळी चार पैकी एक जॅकेट घालतील असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur govind tailor pintu mehadiya four jackets for devendra fadnavis cm oath taking ceremony vmb 67 css